बांधकाम कामगार योजना 2024 अर्ज| पात्रता| फायदे| आवश्यक कागदपत्रे|
![]() |
| बांधकाम कामगार योजना 2024 |
महाराष्ट्र राज्य शासनाने नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बांधकाम कामगार योजना . या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी खूप साऱ्या सवलती शिष्यवृत्ती तसेच आर्थिक सहाय्य महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे. आज आपण या लेखांमध्ये बांधकाम कामगार योजना 2024 यासाठी लागणारे पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच या योजनेचे फायदे व अर्ज करण्याची पद्धत बघणार आहोत.
कामगार नोंदणी पात्रता निकष
1.कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगाराचे वय हे 18 वर्षे ते साठ वर्षे असावे
2. मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे साठी फॉर्म व्ही भरून खाली दिलेल्या कागदपत्रांसोबत अर्ज करून पाठवणे अनिवार्य आहे.
1. रहिवासी पुरावा
2 ओळखपत्र पुरावा
3 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र
4 पासपोर्ट साईज 3 फोटो वयाचा पुरावा
नोंदणी फी 5 रुपये आणि वार्षिक वर्गणी 60 रुपये
बांधकाम कामगार योजना 2024 फायदे
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना पुढील लाभ भेटतात
सामाजिक सुरक्षा
1. नोंदणीकृत लाभार्थीला पहिल्या विवाहाच्या प्रतिकृतीसाठी 30000 रुपये अनुदान भेटेल. यासाठी आवश्यक पात्रता विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असेल तसेच प्रथम विवाह असल्याचे शपथ पत्र आवश्यक असेल.
2. नोंदणीकृत लाभार्थीला मध्यान्न भोजनाचे सोय करून दिली जाते. त्यासाठी विहित नमुन्यातील मागणी पत्र आवश्यक असेल
3. नोंदणीकृत लाभार्थ्याला प्रधान मंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत सहाय्य केले जाते. त्यासाठी पाल्याचे शाळेचे ओळखपत्र आवश्यक असेल.
4. नोंदणीकृत लाभार्थ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. त्यासाठी विहित नमुन्यातील हमीपत्र आवश्यक असेल.
5. नांदणीकृत लाभार्थ्याला प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत सहाय्य केले जाईल त्यासाठी विहित नमुन्यातील हमीपत्र आवश्यक असेल.
6. नोंदणीकृत लाभार्थ्याला पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना अंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाईल.
bandhkam kamgar yojna 2024 in marathi
शैक्षणिक
या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत लाभार्थ्याच्या पहिल्या दोन मुलांसाठी असेल
1.पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 2500 रुपये भेटतील.
2. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष पाच हजार रुपये भेटतील.
त्यासाठी किमान 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती आवश्यक असेल.
3. इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तर दहा हजार रुपये भेटतील.
4. इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्षासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार रुपये भेटतील पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणीकृत लाभार्थ्याच्या मुलांना तसेच पत्नीलाही (जर ती शिकत असेल तर) वीस हजार रुपये भेटतील.
5.नोंदणीकृत लाभार्थ्याच्या मुलांना वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता 100000 रुपये अनुदान भेटेल तसेच नोंदणीकृत लाभार्थ्याच्या मुलांना अभियांत्रिकी अभ्यासक्रम करिता 60000 रुपये अनुदान भेटेल हे अनुदान लाभार्थ्याच्या पत्नीलाही लागू असेल.
6.नोंदणीकृत लाभार्थ्याच्या मुलांना शासनमान्य पदविकेच्या अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपये भेटतील तसेच शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी 25000 रुपये भेटतील. संस्कृत लाभार्थ्यांच्या दोन पाल्यांना एमएससीआयटी शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती केली जाईल
आरोग्यविषयक
1.नोंदणीकृत लाभार्थ्याला नोंदणीकृत पहिल्या दोन अपत्यांना नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपये
शस्त्रक्रियेने प्रसूतीसाठी 20000 रूपये मिळतील.
2.गंभीर आजाराच्या उपचारार्थ 100000 रूपये नोंदणीकृत लाभाथ्याला व त्याच्या कुटुंबियांना भेटतील
bandhkam kamgar yojna 2024 in marathi3.एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 100000 रुपये मुदत बंद ठेव ठेवली जाईल.
4.75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 200000 रूपये भेटतील.
5. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत व इतर आरोग्यविषयक सुविधा पुरवणे.
आर्थिक
1. नोंदणीकृत लाभार्थ्याचा कामावर मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास पाच लाख रुपये दिले जातील
2. कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये कायदेशीर वारसास भेटतील
3.अटल बांधकाम आवास योजना (शहरी) अंतर्गत
200000 रुपये अर्थसहाय्य मिळेल.
4.अटल बांधकाम आवास योजना ग्रामीण अंतर्गत दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळेल.
5. 50 ते 60 वर्ष असलेल्या कामगारांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये अर्थ सहाय्य भेटेल.
6.कामगाराचा मृत्यू झालास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधूर पतीस पाच वर्षापर्यंत 24 हजार रुपये भेटेल.
7.नोंदणीकृत लाभार्थ्याला गृह कर्ज वरील सहा लाख पर्यंत च्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये अर्थसहाय्य भेटेल.
कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी
कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी
“बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे…
- इमारती
- रस्त्यावर
- रस्ते
- रेल्वे
- ट्रामवेज
- एअरफील्ड
- सिंचन
- ड्रेनेज
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह
- निर्मिती
- पारेषण आणि पॉवर वितरण
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना
- इलेक्ट्रिक लाईन्स
- वायरलेस
- रेडिओ
- दूरदर्शन
- दूरध्वनी
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स
- डॅमनद्या
- रक्षक
- पाणीपुरवठा
- टनेल
- पुल
- पदवीधर
- जलविद्युत
- पाइपलाइन
- टावर्स
- कूलिंग टॉवर्स
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.
- रंग, वॉर्निश लावणेइत्यादीसह सुतारकाम.
- गटार व नळजोडणीची कामे.
- वायरिंग
- वितरण
- तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.
- जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी कशी करायची? बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन
या योजने अंतर्गत नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
Related searches

0 Comments