Mgnrega yojna 2023 in marathi|  sarkari yojana 2022

Mnrega-yojna-2023-in-marathi
Mnrega yojna 2023 in marathi 


Mnrega yojna 2023 in marathi 

मनरेगा योजना म्हणजे काय,राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) अर्ज,पात्रता,कागदपत्रे 

ऑगस्ट 2005 मध्ये मनरेगा हा कायदा पास करण्यात आला. या कायद्यानुसार कामाचा अधिकार मिळतो. एप्रिल 2008 पासून ही योजना संपूर्ण भारतात लागू करण्यात आली.                     या योजेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला 100 दिवस रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे.                                             

        मनरेगा योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असते.या योजनेच्या माध्यमातून रोजगार शोधणाऱ्यांना पाच किलोमीटरच्या परिघात काम दिलं जातं आणि त्यासाठी किमान वेतनही दिलं जातं.                              अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत काम न मिळाल्यास त्याला बेरोजगारी भत्ता देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.


Mgnrega अंतर्गत घेता येणारी वैयक्तिक कामे मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1. विहित नमुन्यात अर्ज

2. जॉबकार्ड details

3. संबंधित कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे

4. ग्रामसभेची मान्यता.

जी कामे घेण्याची आहे ती ज्या शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात येतात त्यांच्याकडे ग्रामपंचायत मार्फत अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी करिता पाठविली जातात. त्यानंतर संबधित यंत्रणांकडून सर्व मंजुरी होऊन कार्यारंभ आदेश दिला जातो. हि सर्व माहिती nrega वेबसाईट update करून कामांचे E-musters काढले जातात.


राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजने अंतर्गत केली जाणारी कामे 

वैयक्तिक कामे

  •  शेततळे
  • शोषखड्डे
  •  कंपोस्ट खत/नाडेफ खत/गांडूळ खत टाकी अझोला खत/ जैविक खत निर्मित साचा
  • प्रधानमंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुलचे अकुशल काम
  • सिंचन विहीरी
  • शौचालय
  • शेततळे
  • जनावरांचा गोठा
  • कुक्कुटपालन शेड
  • जलसंधारणाची कामे इत्यादी करण्यासाठीदेखील या योजने अंतर्गत रोजगार पुरविला जातो

  • सार्वजनिक स्वरूपातील कामे
  • CCT
  • - गावात वृक्ष लागवड करणे
  • फळबाग लागवड करणे (फलोत्पादन)
  • - रेशीम उत्पादन, रोपमाळा व वनीकरण करणे
  • - विहिरी/पाझर तलाव/गाव तलावतील गाळ काढणे
  • - पांदण/शेत / वन क्षेत्रातील/गावाअंतर्गत रस्ते / पायवाटा तयार करणे


अभिसरण अंतर्गत घेता येणारी कामे –

      राज्य अभिसरण आराखड्यामध्ये अकुशल भाग हा रोजगार हमी योजना मधून व कुशल भाग इतर योजना मधून दिला जातो. यामध्ये एकूण २८ कामांपैकी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेता येऊ शकणारी कामे खालीलप्रमाणे आहेत. 

  • शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम
  • शाळेकरिता/मैदानाकरिता साखळी कुंपण
  • शालेय स्वयंपाकगृह निवारा
  • अंगणवाडी बांधकाम
  •  ग्रामपंचायत भवन
  • सार्वजनिक जागेवर गोदाम
  •  स्मशानभूमी शेड बांधकाम
  • बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे
  • छतासह बाजार ओटा/ मासे सुकवण्यासाठी व विक्रीसाठी ओटा
  • सामुहिक मत्स्यतळे
  • सिमेंट रस्ता
  • डांबर रस्ता
  • पेव्हिंग block रस्ता
  • नाला मोरी बांधकाम
  •  सिमेंट नाला बांध
  •  RCC मुख्य निचरा प्रणाली
  • भूमिगत बंधारा


जॉबकार्ड (Job card) काढण्यासाठी पात्रता

1. ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.

2. वय वर्ष १८ पासून पुढे असावा.

3. अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी.

सदरची माहिती ग्रामपंचायत मार्फत nrega वेबसाईट भरली जाते व संबंधित मजूर हा nrega साठी पात्र ठरतो. त्याला छोटी पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत देण्यात येते त्यालाच job card म्हणतात.


जॉबकार्ड काढण्याची पद्धत

संबंधित मजुराने खालील कागदपत्रे त्याच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे द्यावी.

1. कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना नंबर १ (ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध आहे)

2. गावातील रहिवाशी असल्याचा पुरावा (रेशनकार्ड zerox, आधारकार्ड zerox, इतर कोणताही पुरावा)

3. बँक पासबुक zerox

4. कुटुंबाचा एकत्रित ४*६ चे ३ फोटो


काम मागणीची पद्धत

1. काम मागणीचा अर्ज नमुना क्र. ४ भरून देणे. 

2. जॉबकार्ड details.

काम मागणी केल्यानंतर १५ दिवसात काम दिले जाते. जर १५ दिवसांत काम दिले गेले नाही तर बेरोजगार भत्ता देण्यात येतो.


शेळीपालन शेड बांधण्याकरिता प्रस्तावाची चेक लिस्ट

1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )

2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)

3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत

4. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)

5. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.

6. आधारकार्ड झेरॉक्स .

7. करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.बाँडपेपरवर).

8. शेळीपालन शेड असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार

9. असल्यास त्याचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर)

10. (शेळीपालन शेडचा असेसमेंट उतारा नसल्यास )

11. जागेचा 7/12 उतारा व 8 अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास

12. सर्व हिस्सेदारांचे मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर )आवश्यक.

13. हमीपत्र, मागणी पत्र

14. दुसऱ्या लाभासाठी २० शेळ्या व तिसऱ्या लाभासाठी ३० शेळ्या असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला

  

वाचा

मृदा आरोग्य कार्ड योजना

किसान रथ मोबाईल ॲप