Mahadbt बियाणे अनुदान योजना 2023
Biyane Anudan Yojana 2023| Mahadbt खते औषधे बियाणे |50%अनुदान योजना| बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरू| असा करा ऑनलाइन अर्ज |Mahadbt Biyane Anudan Yojana 2023| Biyane Anudan Maharashtra 2023| Biyane anudan yojana 2023|sarkari yojana 2022 | sarkari yojanayen
नमस्कार शेतकरी
मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बियाणे वितरण अनुदान 2023
योजनेविषयी माहिती या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये बियाणे वितरण अनुदानात समाविष्ट
जिल्हे कोणते, पिके कोणती असतील, पात्रता काय असेल, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज
कुठे व कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर
तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घेयचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा. कारण
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी पेरणीसाठी औषध, बियाणे, खते
इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी वरती सुरू आहेत.
![]() |
| बियाणे अनुदान योजना 2023 |
Mahadbt Biyane Anudan Yojana Maharashtra 2023 केंद्र शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत समाविष्ट जिल्हे आणि पिके –
राअसुअ भरडधान्य – सांगली, अहमदनगर, औरंगाबाद(मका), जालना,
नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे). राअसुअ गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३
जिल्हे)
राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण
२६ जिल्हे)
राअसुअ भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,
व गडचिरोली (८ जिल्हे)
राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे
अ) बाजरी – नाशिक, धुळे,
जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११
जिल्हे)
ब)ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा,
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी,
हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
क) ऊस –
(औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड. ड) कापूस – (अमरावती विभाग) – अमरावती,
वाशिम, बुलढाणा,अकोला, यवतमाळ. (नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
इ) रागी –
ठाणे (पालघर सह), नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड व रत्नागिरी. (एकूण ७
जिल्हे) (लातूर विभाग) – उस्मानाबाद,नांदेड, लातूर,परभणी,हिंगोली.
| योजनेचे नाव | Mahadbt बियाणे अनुदान योजना |
| जारी करणारा विभाग | कृषी विभाग महाराष्ट्र राज्य |
| योजनेचे कार्यक्षेत्र | महाराष्ट्र राज्य |
| लाभ | बियाणे |
| लाभार्थी | शेतकरी |
Mahadbt Biyane Anudan Yojana Maharashtra 2023 !|क्षेत्र किती असावे
- कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत शेतकऱ्याला लाभ देण्यात येईल.
- बियाण्यास १००% अनुदान हे पिक प्रात्यक्षिका करिता राहील .
- कमाल ५०% मर्यादेपर्यंत प्रमाणित बियाण्याकरिता अनुदान दिले जाईल.लाभार्थी शेतकरी असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत
बियाणे वितरण योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
- जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी, कापूस, ऊस या अंतर्गत कोणत्याही घटकासाठी अर्ज करत असेल, तर वर दिलेले जिल्हे त्यासाठी अनिवार्य आहेत.
- शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
- जर लाभार्थ्याला या पीक योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात गळीत धान्य पीक असणे आवश्यक आहे आणि जर वृक्ष तेलबिया पिकांवर लाभ घ्यायचा असेल, तर त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
मृदा आरोग्य कार्ड योजनेची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा
बियाणे वितरण अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र
- ७/१२ उतारा
- ८-अ प्रमाणपत्र
- पूर्वसंमती पत्र
- हमीपत्र
Biyane Anudan Yojana Maharashtra बियाणे अनुदान योजना 2023 अर्ज कसा व कोठे करावा
या योजने करिता करिता अर्ज करण्यासाठी
तुमच्या जवळच्या कम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन अर्ज करू शकता अर्जाची पोच पावती घेऊ
शकता काही शंका असल्यास तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्या सोबत चर्चा करावी. किंवा Maha-dbt या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरून शकता.
⁸
FAQ
1. Mahadbt बियाणे अनुदान योजना काय आहे?
➡️ ही एक सरकारी योजना आहे. जिचा उद्देश शेतकऱ्यांना स्वस्त दराने बियाणे उपलब्ध करून आर्थिक मदत देणे हा आहे.
2. बियाणे अनुदान योजनेसाठी काय पात्रता आहे?
➡️स्वतःच्या नावावर शेतजमीन असलेले महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र आहेत.
3. बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?
➡️या योजने करिता करिता अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या कम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन अर्ज करू शकता. किंवा Maha-dbt या वेबसाईट वर जाऊन अर्ज भरून शकता.
4. बियाणे अनुदान योजनेअंतर्गत कोणत्या पिकांना अनुदान मिळेल?
➡️कापूस सोयाबीन तूर मूग उडीद खरीप ज्वारी या पिकांना अनुदान मिळेल.
हे ही पाहा

0 Comments