मुळच्या कोल्हापूरच्या  कांबळेवाडी गावातील स्वप्नील कुसळे या मराठी मुलाने Paris Olympics 2024 मध्ये भारताची मान उंचावली आहे. 2024 Summer Olympics मध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स मध्ये भारतासाठी कास्य पदक मिळवून  दिले आहे.   पुरुषांची 50 मीटर रायफल स्पर्धेत   स्वप्निल कुसाळेने भारतासाठी 3 रे कांस्यपदक जिंकले.

स्वप्निल हा कोल्हापूरच्या कांबळवाडी येथे राहणारा आहे. स्वप्निलचे वडील शिक्षक, तर आई सरपंच आहे. कुटुंबीय वारकरी संप्रदाय मानणारे त्यामुळे घरात भक्तीमय वातावरण. स्वप्निलने २०१५ मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. यामधून स्वप्निलच्या नावाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होऊ लागली. कुवेतमध्ये झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकानंतर त्याला भारतीय रेल्वे मध्ये टीसीची नोकरी देण्यात आली. तो सध्या Jr.TE म्हणून कार्यरत आहे. तेव्हाच त्याने पहिली रायफल खरेदी केली. २०१८ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही स्वप्निलने कांस्यपदक मिळवले. मात्र स्वप्निलने ध्येय ऑलिम्पिक स्पर्धेत खेळायचे होते. आता स्वप्निलचे हेही स्वप्न साकार झाल्याचे दिसते.